मनोगत (राजापूर डिजिटल शाळा)
गाव परीसरातल्या जवळपास सर्व शाळा डिजिटल झालेल्या एक राजापूर शाळा तेवढे डिजिटल होयचं बाकी होत ..मनात कुठ तरी खद खद होती कि आपल्या गावातली शाळा डिजिटल का नाही .. ? मग काय मिशन राजापूर डिजिटल सुरु केल.१७ सप्टे २०१७ पासून सुरु केलेल्या मिशन राजापूर डिजिटल शाळा .. १२ जानेवारी २०१९ ला डिजिटल शाळेच्या उद्घाटन सोहळ्यासोबत पूर्ण झाल. मागच्या दीड वर्षापासून केलेल्या प्रयत्नाला यश आले !!!!!!!!!! सुरवातीला प्रतिसाद भेटला नाही थोडा फार विरोध पण झाला , पण खचलो नाही , WhatsAP ग्रुप च्या माध्यमातून म्हणा , फोन वरून म्हणा कि जसा वेळ भेटला तसा गावाकडे जाऊन शाळेच्या बेठकीत शाळा डिजिटल होण्यासाठी प्रयत्न केले.गावात बऱ्याच जणांना डिजिटल शाळा म्हणजे नेमक काय हे सुद्धा माहिती नव्हत. त्यांना डिजिटल शाळेच्या शिक्षणाचे महत्व सांगितले . फक्त सोशल मेडिया च्या माध्यमातून किंवा फोनवरून हे शक्य नव्हते त्यासाठी गावातून सक्रीय असा कोणीतरी पाहिजे होते जे कि गावातून प्रयत्न करतील. उपसरपंच श्री बालाजी पाटील जरीकोटे यांच्या सहयोगाने ती कमतरता हि पूर्ण झाली त्याचं योगदान मोलाच होत. शेवटी १२ जानेवारी २०१९