मनोगत (राजापूर डिजिटल शाळा)
गाव परीसरातल्या जवळपास
सर्व शाळा डिजिटल झालेल्या एक राजापूर शाळा तेवढे डिजिटल होयचं बाकी होत ..मनात
कुठ तरी खद खद होती कि आपल्या गावातली शाळा डिजिटल का नाही ..?
मग काय मिशन राजापूर डिजिटल सुरु
केल.१७ सप्टे २०१७ पासून सुरु केलेल्या मिशन राजापूर डिजिटल शाळा..१२ जानेवारी २०१९ ला डिजिटल शाळेच्या उद्घाटन सोहळ्यासोबत पूर्ण झाल.
मागच्या दीड वर्षापासून केलेल्या प्रयत्नाला यश आले !!!!!!!!!!
सुरवातीला प्रतिसाद भेटला
नाही थोडा फार विरोध पण झाला ,पण खचलो नाही, WhatsAP ग्रुप च्या माध्यमातून म्हणा,फोन वरून
म्हणा कि जसा वेळ भेटला तसा गावाकडे जाऊन शाळेच्या बेठकीत शाळा डिजिटल होण्यासाठी
प्रयत्न केले.गावात बऱ्याच जणांना डिजिटल शाळा म्हणजे नेमक काय हे सुद्धा माहिती
नव्हत. त्यांना डिजिटल शाळेच्या शिक्षणाचे महत्व सांगितले . फक्त सोशल मेडिया च्या
माध्यमातून किंवा फोनवरून हे शक्य नव्हते त्यासाठी गावातून सक्रीय असा कोणीतरी
पाहिजे होते जे कि गावातून प्रयत्न करतील. उपसरपंच श्री बालाजी पाटील जरीकोटे
यांच्या सहयोगाने ती कमतरता हि पूर्ण झाली त्याचं योगदान मोलाच होत.
शेवटी १२ जानेवारी २०१९ रोजी मा आमदार श्री
वसंतरावजी चव्हाण (नायगाव विधानसभा मतदारसंघ) साहेबाच्या हस्ते राजापूर डिजिटल शाळेच
उद्घाटन झाले. त्यावेळेसह प्रमुख पाहुणे म्हणून श्री दत्तात्रेय रेड्डी साहेब
(कृषी व पशु संवर्धन सभापती जि. प. नांदेड) यांची उपस्थिती लाभली. सोबत आमचे
इंजिनियरिंग कॉलेजचे वर्गमित्र श्री सुधाकर पाटील यांची हि या उद्घाटन प्रसंगी
उपस्थित होते.
मी आवर्जून नमूद करू इच्छितो श्री मारोती
बानेवार व श्री विजय गोशलवार जे कि पुणे येथे राहून सुद्धा या मिशन मध्ये त्यांनी
पूर्ण पाठिंबा च नाही तर शाळा डिजिटल होण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले,सहकार्य केले. शाळेचे मुख्याध्यापक
रेनिवाड सर व डीब्बेवार सर यांनी जी मेहनत घेतली शाळा डिजिटल होण्यासाठी त्यांचे
कौतुक करावे तेवढे कमी..माझा सलाम या दोन्ही शिक्षकांना..मी धन्यवाद देऊ इच्छितो
शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री धडेकर सर ज्यांनी डिजिटल शाळेच्या स्वप्नाचे बीज
माझ्या मनात पेरले. आशा आहे या डिजिटल शाळेचा उपयोग
घेऊन राजापूर चे विद्यार्थी आपले भविष्य उज्वल करतील व त्यामध्ये शिक्षकांचे योग्य
ते सहकार्य लाभेल.
-बालाजी राजापूरकर
Comments
Post a Comment
Enter Your Comment Here...