Posts

Showing posts from June, 2020

मनोगत (राजापूर डिजिटल शाळा)

Image
गाव परीसरातल्या जवळपास सर्व शाळा डिजिटल झालेल्या एक राजापूर शाळा तेवढे डिजिटल होयचं बाकी होत ..मनात कुठ तरी खद खद होती कि आपल्या गावातली शाळा डिजिटल का नाही .. ?    मग काय मिशन राजापूर डिजिटल सुरु केल.१७ सप्टे २०१७ पासून सुरु केलेल्या मिशन राजापूर डिजिटल शाळा .. १२ जानेवारी २०१९ ला डिजिटल शाळेच्या उद्घाटन सोहळ्यासोबत पूर्ण झाल. मागच्या दीड वर्षापासून केलेल्या प्रयत्नाला यश आले !!!!!!!!!!   सुरवातीला प्रतिसाद भेटला नाही थोडा फार विरोध पण झाला , पण खचलो नाही , WhatsAP ग्रुप च्या माध्यमातून म्हणा , फोन वरून म्हणा कि जसा वेळ भेटला तसा गावाकडे जाऊन शाळेच्या बेठकीत शाळा डिजिटल होण्यासाठी प्रयत्न केले.गावात बऱ्याच जणांना डिजिटल शाळा म्हणजे नेमक काय हे सुद्धा माहिती नव्हत. त्यांना डिजिटल शाळेच्या शिक्षणाचे महत्व सांगितले . फक्त सोशल मेडिया च्या माध्यमातून किंवा फोनवरून हे शक्य नव्हते त्यासाठी गावातून सक्रीय असा कोणीतरी पाहिजे होते जे कि गावातून प्रयत्न करतील. उपसरपंच श्री बालाजी पाटील जरीकोटे यांच्या सहयोगाने ती कमतरता हि पूर्ण झाली त्याचं योगदान मोलाच होत.   शेवटी १२ जानेवारी २०१९

सुशांत सिंग राजपूत चे अचानक जाणे...

Image
सुशांत सिंग राजपूत चे 14 जून 2020 ला अचानक जाणे बऱ्याच जणांच्या मनाला चटका लावून गेला. नेपोटीजम असो, की बॉलिवूड मधील घराणेशाही असो ,मैत्रिनी सोबतच्या नात्यामधला दुरावा म्हणा,त्याच्या आत्महत्येमागचया या चर्चा अजून ही सोशल मीडिया वर चर्चिल्या जात आहेत.  एक मात्र नक्की बॉलिवूड चा पडद्याआड चा घाणेरड राजकारण यामुळे उघडे पडले. या रंगीबिरंगी ताऱ्याच्या दुनियेत ही एक काळोख आहे जे दिसून येत नाही. भाई कॅम्प म्हणा की बड्या ब्रँड च्या कॅम्प म्हणा चित्रपटात भावनिक कथा दाखवून भोळ्या लोकांना आपला खऱ्या आयुष्यातला खलनायक चेहरा झाकून ही कॅम्प मंडळी बऱ्याच अंशी यशस्वी ठरतात.  पण सुशांत सिंघ च्या आत्महत्येने बॉलिवूडचा खरा चेहरा उघडा पडलाय.  ज्या पद्धतीची वागणूक बाहेरून आलेल्या नवीन चेहऱ्याला हे बडी मंडळी देतात ते निश्चितच घातक आहे.  'अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा... अब राजा वही बनेगा जो हकदार होगा!' हा सुप्रसिद्ध डायलॉग सुपर 30 चित्रपटातला फक्त चित्रपटातच शोभून दिसतो खऱ्या आयुष्यात हे फार च कमी प्रमाणात दिसून येते कारण राजकारण म्हणा की बॉलिवूड जर निरीक्षण केल तर तुम्हाला जास्तीत जास